भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे बैल पोळा संपन्न
दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी परंपरेनुसार यावर्षी सुद्धा बैल पोळा सण भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम श्री. सुबोधदादा, मार्गदर्शक व संचालक, भु-वैकुंठ अड्याळ टेकडी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच डॉ. नवलाजी मुळे, अध्यक्ष अड्याळ टेकडी, सुश्री. रेखाताई, कार्याध्यक्ष अड्याळ टेकडी, सौ. उषाताई भुरे व श्री. अनिलजी भुरे, ब्रम्हपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमासाठी टेकडीवरील सर्व साधक गण उपस्थित होते.
बैल पोळा सणानिमित्त विशेष आयोजन
बैल पोळ्यानिमित्त जीवन शिक्षण गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी बैलांना सुंदररीत्या सजवून तोरणात आणले. यावेळी श्री. मनोहारजी पारधी बावाजी व साधकांनी झडत्या म्हटल्या.
त्यानंतर तोरणामध्ये बैलांचे पूजन व आरती करण्यात आली आणि तोरण तोडण्यात आले. त्यानंतर गुरुपद गुंफेला प्रदक्षिणा करून बैल सामोर आणले.

यानंतर श्री. सुबोधदादा यांनी बैल पोळ्यानिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या पुढील भागात वरीष्ठ मंडळींनी पूजन करून बैलांना सहभोजन देण्यात आले.
परंपरा, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बैल पोळा कार्यक्रमात टेकडीवरील सर्व साधक गण सहभागी झाले.












