आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे सुभाष चंद्र बोस जयंती व ग्रामसभा–पंचायत राज प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी आत्मानुसंधान भू वैकुंठ, अड्याळ टेकडी येथे सुभाष चंद्र बोस जयंती व ग्रामसभा–पंचायत राज प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कार्यक्रमास श्री. सुबोधदादा, संचालक, भू वैकुंठ अड्याळ टेकडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच श्री. अविनाश भाऊ आंबेकर (चंद्रपूर), श्री. प्रवीणजी राऊत, अध्यक्ष – पोलिस समन्वयक समिती, भारत, श्री. रुपचंद भाऊ दखणे (घाटी) व श्री. दुष्यंत गाडकीने (नागपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिबिरात ग्रामसभा, भारतीय संविधान, ग्रामविकास व लोकसहभाग या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरास अड्याळ, ऊश्राळ मेंढा, खडकी, भिवंडी (ठाणे), ब्रह्मपुरी, सारंगढ, कोजबी चक, जवरा बोडी, ढोलसर, पुयार दंड, वाकरला, कोकडी, नागपूर, उमरी, अर्जुनी, चंद्रपूर आदी विविध भागांतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सांगता शांतीपाठ, जयघोष व महाप्रसादाने करण्यात आली.




