Prajasattak Din Shibir

अध्यात्म गुरुकुल, जामदरी टेकडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी अध्यात्म गुरुकुल, जामदरी टेकडी येथे देशाचा राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आदरणीय श्री. सुबोधदादा (संचालक व मार्गदर्शक, भू-वैकुंठ अड्याळ/टेकडी) यांच्या हस्ते पार पडला.

या वेळी आदरणीय श्री. चैतन्य महाराज (कोंडदेव आश्रम), श्री. ज्ञानेश्वर केसाळे महाराज, श्री. गोपाळराव चव्हाण महाराज, श्री. गंगाप्रसाद बाशेट्टी, जामदरी आश्रमाध्यक्ष श्री. शेषराव कदम पाटील, तसेच सर्व सहकारी, जवळच्या गावांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सुबोधदादा यांनी देशातील सद्यस्थिती, नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, त्यावर उपाययोजना, तसेच ग्रामगीता तत्वज्ञान या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. ज्ञानेश्वर केसाळे महाराज, निर्मलाताई खडतकर व उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आपले विचार व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.