गॅलरी

गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, वीज, पाणी नाही – तर विचारांची, वागणुकीची, संस्कारांची व जीवनपद्धतीची उन्नती” हा आमचा विश्वास आहे.

अड्याळ टेकडीवरील प्रमुख स्थळांचे फोटो

गुरुपद गुंफा: सन १९६७ मध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या झीलबुलींच्या गुंफेमध्ये बसून चार तास विश्रांती घेतली आणि त्यानंतर पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या योगसाधना व कार्यासाठी या तपोभूमीची निवड केली. वास्तविक हे स्थळ भु-वैकुंठ अध्याय टेकडीचे शक्ती केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

ग्रामगीता विश्वविद्यापीठ: येथे योग-निसर्गोपचार प्रशिक्षण, पंचगव्य चिकित्सा प्रशिक्षण, जीवन शिक्षण अध्यात्म गुरुकुल तसेच चटई विणाई, कपडा विणाई (हातमाग) इत्यादी स्वावलंबी प्रयोग कार्यरत आहेत. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील तत्वज्ञानावर आधारित हे विद्यापीठ आहे.

महासमाधी (संकल्पधाम): दिनांक 8 जून 2006 ला कर्मयोगी संत पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांचे महानिर्वाण झाले. 10 जून 2006 ला कर्मश्री पूज्य शिवशंकर भाऊसाहेब (विश्वस्त श्री गजानन महाराज संस्थान शेगाव) यांच्या शुभहस्ते पूज्य दादांचा अंतिम समाधी संस्कार कार्यक्रम करण्यात आला.

आदर्श महिला आश्रम: महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा एक स्वतंत्र आणि स्वायत्त प्रयोग आहे. येथून सर्व दैनिक कार्यप्रवृत्या आणि विविध शिबिरांचे स्वतंत्रपणे संचालन केल्या जाते. हा भु-वैकुंठ अड्याळ टेकडीच्या महिलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. येथे विविध कौशल्यविकास, उपक्रम राबवले जातात.

सत्संग भवन: दिनांक 15 ऑक्टोबर 1967 ला श्री तुकडोजी महाराजांनी या वास्तूचे भूमिपूजन केले. येथील सर्व वार्षिक उत्सव, कार्यक्रम, सत्संग, प्रवचन, बौद्धिक इत्यादी सर्व येथे साजरे केले जातात. हे भवन आध्यात्मिक विचारांचा प्रसार आणि समाजजागृतीचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

गोरक्षण व शेती: हा देशी प्रजातींच्या गाईंच्या पालन-पोषण आणि त्यांच्याच खतापासून शेतीत विषमुक्त उत्पादन करून स्वावलंबन व विनारायसनिक आरोग्यदायी अन्ननिर्मिती करण्याचा एक आदर्श प्रयोग आहे. या उपक्रमातून नैसर्गिक जीवनपद्धतीचा प्रसार घडवला जातो.

जीवन शिक्षण शिबीर

“गाव जागल्याशिवाय राष्ट्र जागणार नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कर्मातून समाज उभारावा, हीच खरी देशभक्ती आहे.”
— संत श्री तुकडोजी महाराज