गुरुदेव सेवा मंडळ एकार्जुना: तत्त्वज्ञान कार्यकर्ता बैठक व श्रम प्रतिष्ठा पुस्तक प्रकाशन
दिनांक १३ डिसेंबर, शनिवार रोजी गुरुदेव सेवा मंडळ, एकार्जुना (ता. वरोरा, जि. चंद्रपूर) येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्त्वज्ञान कार्यकर्ता बैठक व “श्रम प्रतिष्ठा” पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व पुस्तकाचे लेखक श्री सुकदेवजी सुकळे (श्रीरामपूर, जि. नगर) होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सुबोधदादा (संचालक, भू-वैकुंठ अड्याळ टेकडी) उपस्थित होते.

कार्यक्रमास पुढील मान्यवरांची उपस्थिती लाभली:
- श्री वा. ग. वैद्य गुरुजी
- श्री लक्ष्मणराव पराते गुरुजी
- आनंदवन महारोगी समितीचे सचिव श्री सुधाकरजी कडू सर
- पंढरपूर सक्रिय दर्शन मंदिराचे अध्यक्ष श्री जनार्दन देठे गुरुजी
- तसेच विविध गावांतील गुरुदेव भक्त
दीपप्रज्वलन व अधिष्ठान पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री कुंदन वाटकर यांनी केले.
प्रस्ताविकात, श्री सुबोधदादा यांनी पू. तुकारामदादा गीताचार्य, श्री शिवशंकर भाऊ पाटील (भाऊसाहेब) व आदरणीय ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या कार्याचा व श्रम महात्म्याचा सविस्तर उहापोह केला.
यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते “श्रम प्रतिष्ठा” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.
प्रकाशनप्रसंगी लेखक श्री सुकदेवजी सुकळे यांनी मा. रावसाहेब शिंदे, पू. तुकारामदादा गीताचार्य व पू. भाऊसाहेब शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील त्यांच्या भेटीचा व तेथील प्रत्यक्ष जिवंत कार्याचा अनुभव सविस्तरपणे मांडला.
यानंतर श्री सुधाकर कडू, प्रा. शिव सर, पराते गुरुजी, वैद्य गुरुजी इत्यादी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सेवा मंडळातील तरुण-युवतींनी गीत-भजनाद्वारे कार्यक्रमाला सुंदर व सुसंस्कृत स्वरूप दिले.
या कार्यक्रमात एकार्जुना, तेमुर्डा, जामणी, केम, तडगाव, परसोडा, रान तलोधी, गिरसावली, वरोरा, तळेगाव शेंबळ व बेलगाव येथून सुमारे ८० गुरुदेव भक्तांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता शांतीपाठ व महाप्रसादाने करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन गुरुदेव सेवा मंडळ, एकार्जुना यांनी केले.











