आमच्याबद्दल

अडयाळ टेकडी संस्थान केवळ प्रकल्प राबवत नाही तर नव्या प्रकारच्या “ग्रामगुरुकुल” संकल्पनेवर काम करते – जिथे लोक प्रत्यक्षात येऊन शिकतात, अनुभव घेतात आणि आपल्या गावात बदल घडवतात.


विनम्र अभिवादन

प्रेरणास्रोत
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
ग्रामस्वराज्याचे प्रणेते
कर्मयोगी संत पु. तुकाराम दादा गीताचार्य
परमपूज्य
आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे

भु-वैकुंठ अड्याळ टेकडीची विशेषता

  • राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतातून स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि स्वशासित समाजवादी समाजरचनेचा प्रात्यक्षिक प्रयोग
  • सर्वधर्म समभावाच्या आध्यात्मिक अधिष्ठानावरून निष्काम श्रमदान द्वारा जनशक्तीच्या आधारे सर्व कार्याचे संचालन
  • संस्था, ट्रस्ट, रजिस्ट्रेशन तसेच सरकारी अनुदान, योजना या सर्वांपासून पूर्णपणे मुक्त
  • येथे कोणाला कोणतीही मजूरी, मोबदला किंवा मानधन नाही, सर्व समर्पित सेवक आहेत, सर्व मालक आणि सर्व सेवक
  • सर्वांना काम करण्याची संधी, सर्वांसाठी सारखी दिनचर्या व व्यवस्था, सामुदायिक उत्पादन आणि सामुहिक उपभोग
  • येथील समर्पित सभासद व समाजातील सेवाभावी सहयोगी सभासद असे दोन्ही मिळून संपूर्ण व्यवस्थेचे सामुदायिक संचालन
  • गावकाऱ्यांच्या तन, मन, धन आणि श्रमदानातून येथील सर्व इमारत वास्तूंची व प्रयोगांची निर्मिती

आश्रमातील दैनिक कार्यक्रम

सामुदायिक ध्यान-प्रार्थना, सत्संग, अध्ययन, चर्चासत्र, श्रमदान, सफाई, शेती-वाडी, गोसंरक्षण, ग्रामोद्योग आणि प्रचार-प्रसार

संचालक आणि मार्गदर्शक

श्री सुबोध दादा

श्री सुबोधदादा हे भु-वैकुंठ अड्याळ टेकडी संस्थानचे विद्यमान संचालक व प्रमुख मार्गदर्शक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आदर्शांनुसार जनजागृतीचे कार्य करत असताना त्यांनी महाराजांच्या अलौकिक ‘ग्रामगीता’ ग्रंथाचे तत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये सोप्या शब्दांत विवरण केले आहे.

या विवरणाव्यतिरिक्त त्यांनी अनेक अन्य पुस्तके देखील लिहिली आहेत. ते आपल्या नेतृत्वाखालील सामुदायिक प्रार्थना, श्रमदान आणि सामाजिक उपक्रमांतून महाराजांच्या स्वयंपूर्ण व नैतिक समाज-रचनेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी निरंतर मार्गदर्शन करत आहेत.

“आपलं जीवन इतरांसाठी उपकारक ठरलं,
तरच त्याला अर्थ प्राप्त होतो.”
— संत श्री तुकडोजी महाराज