jeevanshikhan-shibir-june-4

भू वैकुंठ अड्याळ टेकडी अंतर्गत विविध प्रांतात जीवन शिक्षण शिबिर संपन्न

आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी द्वारे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी मुलामुलींसाठी अड्याळ टेकडी सोबतच बाह्य भागात सुद्धा जीवन शिक्षण संस्कार शिबिर आयोजित केले जातात.

यामध्ये मुलामुलींना सकाळी ब्रम्हमुहुर्त वर उठण्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत एक आदर्श दिनचर्या, सामुदायिक ध्यान-प्रार्थना, योग प्राणायाम, लाठी काठी, दांडपट्टा, कराटे, ढाल तलवार, ग्रामोद्योग गृहोद्योग, बौध्दिक, भजन भाषण, योग निसर्गोपचार, पंचगव्य उत्पादन इत्यादी गोष्टी क्रमाक्रमाने शिकवल्या जातात.

संचालक व मार्गदर्शक श्री सुबोध दादा, अध्यक्ष नवलाजी मुळे, कार्याध्यक्ष सुश्री रेखाताई, सुश्री गंगाताई यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून व भू वैकुंठ अड्याळ टेकडी वरून प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या माध्यमातून यावर्षी खालील ठिकाणी जीवन शिक्षण शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले :

  • भू वैकुंठ अड्याळ टेकडी, ब्रम्हपुरी, चंद्रपूर
  • माय मंजुळा गोरक्षण, आंबोली चौरस्ता, चिमूर, चंद्रपूर
  • गुरुदेव सेवा मंडळ, औष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जा नगर, चंद्रपूर
  • अध्यात्म गुरुकुल, जामदरी टेकडी, भोकर, नांदेड (मराठवाडा)
  • गुरुदेव सेवा मंडळ तालुका कार्यकर्ता समिती, सौंसर, छिंदवाडा, मध्य प्रदेश
  • गुरुदेव सेवा मंडळ, चौगान, ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर

इतक्या ठिकाणी जीवन शिक्षण शिबिर संपन्न झाले व यातून शेकडो विद्यार्थी स्वावलंबी, सक्षम व संस्कारक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.