अड्याळ टेकडी येथे १६ दिवसीय जीवन शिक्षण शिबिर संपन्न; विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
आत्मानुसंधान भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ५ मे ते २० मे दरम्यान जीवन शिक्षण शिबिर प्रमुख मार्गदर्शक व संचालक श्री सुबोधदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
शिबिराचे अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे, कार्याध्यक्षा सुश्री रेखाताई तसेच सुश्री लक्ष्मीताई व सुश्री गंगाताई यांनी संपूर्ण शिबिराचे बौद्धिक मार्गदर्शन व संचालन केले. या शिबिरात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, नांदेड आदी जिल्ह्यांतील सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
श्री अक्षय कुळे गुरुजी, श्री गणेश लांजेवार सर (कराटे प्रशिक्षक), श्री जोशेष वाढई गुरुजी, श्री आयुष आस्वले गुरुजी, कु. शीतल भाजीपाले, कु. पूजा व आरती दोनाडकर, कु. विशाखा काजरखने, कु. तेजस्विनी भाजीपाले, कु. संचिता बोरकुटे, कु. डीना मेश्राम, कु. श्रेया चौधरी व कु. दीक्षा वाघ यांनी विद्यार्थ्यांना सामुदायिक ध्यान-प्रार्थना, शिवकालीन युद्धकला, ग्रामोद्योग, ग्रामगीता ग्रंथ अभ्यास, योग-निसर्गोपचार, पंचगव्य उत्पादन, गीत, भजन व भाषण आदी विषयांचे प्रशिक्षण दिले.
दि. २० मे रोजी सायंकाळी ६ ते ९.३० वाजेदरम्यान शिबिराचा भव्य समारोपीय प्रदर्शन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री वाल्मीक वैद्य गुरुजी, डॉ. अनंता कुंभारे, श्री नामदेव आस्वले गुरुजी, प्रचारिका सौ. बेबीताई काकडे, श्री लक्ष्मण पराते गुरुजी, श्री आनंदराव घोणमोडे व श्री दिलीप मेश्राम सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निरंजन ठवरे गुरुजी यांनी केले. श्री धनेशभाई अग्रवाल (दुर्गा राईस मिल) यांनी सर्वांसाठी महाप्रसाद भोजनदान केले, तर श्री खेमराज तिडके यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सांभाळली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री राजेंद्र राऊत, श्री सुभाष मेश्राम, श्री विकास गजभे, श्री संतोष जांभुळे, श्री केशव हिवरकर, श्री रामदास नखाते, सौ. मनोरमा मैंद, सौ. माधुरी चौधरी, सौ. लक्ष्मी निहारे व सौ. पद्मा भेंडारकर यांनी व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.


































