भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील विविध पुस्तकांचे प्रकाशन – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव २०२५
स्थळ: अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त, अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी येथे हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील विविध ग्रंथांचे प्रकाशन संपन्न झाले.

या विशेष प्रसंगी खालील महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित करण्यात आलीः
- विचारधारा – खंड १
- विचारधारा – खंड २
- कार्यशृंखला
- विश्वात्मक देव आणि सामूहिक प्रार्थना
- गावातून विश्वाकडे
- Letters of Tukadoji
- The Essence of Gramgeeta
- ग्रामगीता सार (हिंदी)
- Voice of Sant Tukadoji (त्रैमासिक)
- ग्रामस्वराज्य दिनदर्शिका २०२६
या प्रकाशन कार्यात विविध मान्यवरांनी आपले योगदान दिले आहे —
प.पू. तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या जुन्या प्रवचनांचा आणि साप्ताहिकातील लेखांचा संग्रह श्री सुबोधदादा यांनी करून त्यावर आधारित “विचारधारा” हे दोन खंड तयार केले.
डॉ. रत्नाकर भेलकर यांनी राष्ट्रसंतांच्या निवडक पत्रांचा इंग्रजी अनुवाद केला.
श्री राजेश डोमळे (पवनी) यांनी ग्रामगीता सार या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला.
इंजी. भाऊसाहेब थुटे यांनी विश्वात्मक देव आणि सामूहिक प्रार्थना या विषयावर पुस्तक लेखन केले.
हे सर्व ग्रंथ सप्त खंजेरी प्रबोधनकार इंजी. भाऊसाहेब थुटे, श्री रवीदादा मानव (संचालक, अध्यात्म गुरुकुल मोझरी), डॉ. रत्नाकर भेलकर (नागपूर), श्री नरेंद्रभाऊ जीवतोडे (नंदुरी), श्री अंकुशभाऊ आगलावे (वरोरा), आणि श्री सुबोधदादा (संचालक, भु-वैकुंठ अड्याळ टेकडी) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
🙏 हे प्रकाशन राष्ट्रसंतांच्या विचारधारेचा प्रसार अधिक व्यापक करण्याचा एक प्रयत्न आहे.










