१३ वे राष्ट्रीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलन — तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) — सुबोध दादा यांचे मार्गदर्शन
दिनांक १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान १३ व्या राष्ट्रीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलन, तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) प्रसंगी देशभरातील गउँप्रेमी भक्तांना संबोधन करताना सुबोध दादा यांनी सांगितले की, मनुष्यापासून परिवार, समाज, गाव, राष्ट्र ते विश्वापर्यंतचे उत्थान करण्याच्या दृष्टीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा युगग्रंथ निर्माण केला असून त्यात १५ वा अध्याय गोवंश सुधार हा आहे.

फोटो गॅलरी
गोवंश सुधार अध्याय व त्याचे वैज्ञानिक प्रायोगिक महत्त्व
या अध्यायाला विज्ञानाच्या आधारे प्रत्यक्ष प्रायोगिक स्तरावर लोकांना समजावून गायीच्या माध्यमातून आपले आरोग्य, संस्कार, अध्यात्म, अर्थव्यवस्था, गुरुकुल शिक्षण व्यवस्था सिद्ध केली आहे.
कर्मयोगी संत पू. तुकारामदादा गीताचार्य यांची तपोभूमी भू वैकुंठ अड्याळ टेकडी ही पंचगव्य चिकित्सा चे ट्रेनिंग सेंटर असून त्याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो गव्यसिद्ध निर्माण झाले आहे.
राष्ट्रसंतांचे स्वप्न आणि पंचगव्याचे योगदान
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वप्न –
तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा
हे गोमातेच्या द्वारेच साकार होऊ शकते.
तन – शारीरिक आरोग्य
कारण प्रथम तन म्हणजे शरीर म्हणजे अधिकतर शारीरिक व्याध्यांचे उपाय निरसन आपल्या घरी- गावीच गायींच्या पंचगव्य मधून अगदी सहजपणे होऊ शकते.
मन – मानसिक स्वास्थ्य
दुसरे, मन म्हणजे मानसिक विकृतीमुळे निर्माण झालेले depression, nervousness, migraine, frustration या सर्वांचे निराकरण गायींच्या सहवासातून, तिच्या आभामंडळातून सहज होऊ शकते.
धन – अर्थव्यवस्था
तिसरे म्हणजे धन म्हणजे अर्थव्यवस्था जी गायीच्या पंचगव्याच्या माध्यमातून विविध औषधी, वस्तू, शेती करून सहज प्राप्त केल्या जाऊ शकते, हे अनेक वर्षांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे आणि वर्तमानकाळात तर याचे उत्पादन अजून वृद्धिंगत होत आहे.
अड्याळ टेकडीवरील कार्य
पू गुरुजी निरंजन भाई वर्मा यांच्या मार्गदर्शनात हे कार्य भू वैकुंठ अड्याळ टेकडी वरून गेल्या दहा वर्षापासून अविरत सुरू आहे.
महिलाश्रम अड्याळ टेकडी च्या प्रमुख सुश्री रेखाताई या विभागाची जबाबदारी सांभाळत असून दरवर्षी पंचगव्य कार्यशाळेचे आयोजन केल्या जात आहे.
चंद्रपूर चे हेमंत शेटे गुरुजी सुद्धा या उपक्रमाला निरंतर साथ सहयोग देत असतात.
ग्रामगीतेतील मार्गदर्शन
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता मध्ये जसे सांगितले आहे की,
रामराज्यची ग्रामराज्य, स्वावलंबन हेचि स्वराज.
म्हणजे रामराज्य साकार करण्यासाठी ग्रामराज्य म्हणजे ग्रामस्वराज्य निर्माण करावे लागेल. याद्वारेच ग्रामनिर्माण ते राष्ट्रनिर्माण होईल व त्यासाठी प्रत्येक ग्राम हे स्वावलंबी, स्वयंशासित व स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.
यासाठी गायिचे महत्त्व अनंत आहे. त्यासाठी अशा गव्यसिद्ध संघटना व संमेलनाचा अतिशय उपयोग होणार आहे.
ग्रामसभा – गावाची संसद
७३ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ग्रामास सार्वभौम अधिकार मिळाले असून ग्रामसभा ही आपल्या गावाची संसद आहे.
त्याला वैधानिक मजबुती व मान्यता असल्यामुळे गाय आणि पंचगव्य चिकित्सा संबंधी अधिकाराचे सर्व महत्वाचे निर्णय हे गावाच्या ग्रामसभेतून घेतले जाऊ शकतात.
त्यासाठी पू तुकारामदादा गीताचार्य यांच्या मार्गाने आपल्याला गावागावात ग्रामसभा म्हणजेच ग्रामस्वराज्य निर्माण करण्याची गरज आहे.









